॥ श्री ॥

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत


मार्गशीर्ष शु.८, शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव ‘जय पॅलेस’ सभागृह, कोल्हापूर येथे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच साधकांचे आगमन होऊ लागले होते. सभागृहामध्ये अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्‌गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी, प.पू.सद्‌गुरु श्री.मामा महाराज, प.पू.सद्‌गुरु सौ.ताई महाराज व श्रीसद्‌गुरु परंपरेच्या प्रतिमा मुख्य व्यासपीठावर विराजमान होत्या. अत्यंत सुरेख व सुबक रीतीने केलेली पुष्पसजावट वातावरणाच्या प्रसन्नतेत अधिकच भर घालत होती. साधक व अभ्यासू वाचकांकरिता ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांचा तसेच ‘अमृतबोध’ मासिकांचा असे दोन्ही स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याचबरोबर श्रीक्षेत्र आंबेरी येथील सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.