॥ श्री ॥

श्रीदत्तधाम, वर्धा येथे संपन्न झालेल्या सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाचा वृत्तांत


विदर्भ ही प्रज्ञावंतांची तसेच संतांची प्रिय भूमी. श्रीभगवंतांची सुद्धा ही अत्यंत प्रिय भूमी आहे, कारण हे त्यांचे श्वशुरगृह आहे. वर्धा जिल्ह्यातील कौण्डिण्यपूर हे श्रीरुक्मिणीदेवींचे माहेर. अशा या पावन प्रदेशातील वर्धा नगरीमध्ये कारला नावाच्या छोट्याशा गावात एक सुबकशी टेकडी आहे. अत्यंत शांत, रमणीय अशा या परिसरात प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादांच्या संकल्पाने आणि त्यांच्याच कृपेने भव्य असे भगवान श्रीदत्तात्रेयांचे मंदिर व एक सभागृह निर्माण करण्यात आले आहे. गतवर्षीच प.पू.सद्‌गुरु श्री.दादांच्या पावन करकमलांनी येथे श्रीदत्तप्रभूंच्या अष्टधातुमय एकमुखी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. जयपुरी दगडातील अष्टकोनी गर्भगृह, प्रशस्त सभामंडप, नक्षीदार गवाक्षे व भव्य असा नक्षीदार लाकडी दरवाजा; मंदिरासमोर सुबक, उंच दीपमाळ; बाजूला असणाऱ्या ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सभागृहा’त प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री. मामा महाराज व प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.ताईमहाराज यांच्या भव्य तसबिरींबरोबरच भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची सजीव भासणारी मूर्ती विराजमान आहे. निसर्गरम्य व पवित्र अशा या स्थानी साहजिकच अभ्यागतांची मने प्रसन्न होतात. याच परिसरात श्रीसद्‌गुरुकृपेने सोमवार आणि मंगळवार, दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२५ असे दोन दिवस या वर्षीचा सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहाने व आनंदाने संपन्न झाला. त्यानिमित्ताने साधकांसाठी कृपायोग-शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.